Librería Samer Atenea
Kálamo Books
Librería Elías (Asturias)
Librería Kolima (Madrid)
Librería Proteo (Málaga)
’प्रवाह ऱ्हाईनचा - वेध जर्मन संस्कृतीचा’ हे जर्मनी या देशाची सखोल माहिती देणारं पुस्तक आहे. दुसऱ्या महायुद्धापूर्वीचा आणि नंतरचा जर्मनी हा देश लेखकाने यामध्ये उलगडला आहे. जर्मनीतली माणसं, तिथली संस्कृती, त्यांचा निसर्गाशी असलेला स्नेह, तिथली शिस्तबद्धता यांविषयी लेखकाने आवर्जून लिहिले आहे. जर्मनीतील लोकांच्या दैनंदिन जीवनापासून त्यांच्या सामाजिक शिष्टाचारापर्यंत प्रत्येक विषयाला लेखकाने स्वतंत्रपणे स्पर्श केला आहे. वाचकाच्या मनात जर्मनीविषयी कुतूहल निर्माण करणारे हे पुस्तक आवर्जून वाचायला हवे.