Librería Samer Atenea
Kálamo Books
Librería Elías (Asturias)
Librería Kolima (Madrid)
Librería Proteo (Málaga)
'जगभरात शैक्षणिकदृष्ट्या 20 विकसित देश आहेत. त्यांच्या इथे बालवाडीपासून ते विद्यापीठीय शिक्षण कसे दिले जाते, त्याचे स्वरूप काय असते, याविषयी सविस्तर माहिती या पुस्तकात आहे.या 20 देशांमध्ये युनायटेड किंगडम (इंग्लंड), युनायटेड स्टेटस (अमेरिका), ऑस्ट्रेलिया, नेदरलँडस् (हॉलंड), स्वीडन, फ्रान्स, डेन्मार्क, कॅनडा, जर्मनी, स्वित्झर्लंड, जपान, इस्रायल, फिनलंड, तैवान, सिंगापूर, स्लोव्हेनिया, दक्षिण कोरिया, नॉर्वे, बेल्जिअम, संयुक्त अरब अमिराती (यूएई) या देशांच्या शिक्षणपद्धतीची सविस्तर माहिती या ग्रंथात मिळत आहे.त्या देशाची पार्श्वभूमी, शिक्षणरचना, कार्यपद्धती, बालवाडी ते विद्यापीठीय शिक्षणाचे स्वरूप इत्यादी अंगांनी आपणास त्या त्या देशांची शिक्षणपद्धती या ग्रंथामध्ये अभ्यासायला मिळते.सोबतच भारताच्या शिक्षणपद्धती व शिक्षणधोरण 2020 यांचा त्या सर्व देशांशी तुलनात्मक अभ्यास व विचारविमर्श या पुस्तकात आहे. त्या 20 देशांपैकी आपण काय काय घेतले पाहिजे आणि भारताच्या शिक्षणपद्धतीमध्ये काय सकारात्मक बदल केले पाहिजेत, याविषयी या पुस्तकात अतिशय शास्त्रशुद्ध व अभ्यासपूर्ण पद्धतीने सांगितले आहे'