Librería Samer Atenea
Kálamo Books
Librería Elías (Asturias)
Librería Kolima (Madrid)
Librería Proteo (Málaga)
देशीय राजकारणाला वळण लावणाऱ्या २०१४ च्या निवडणुकांच्या आसपासचा हा काळ. राजकारण स्थानिक असो, राष्ट्रीय की आंतरराष्ट्रीय, त्यात आहे ते टिकवण्याचा, नाही ते मिळवण्याचा संघर्ष अटळ असतो.मात्र या निवडणुका हा प्रतिमांच्या निर्मितीचा, व्यवस्थापनाचा, विरोधकांच्या प्रतिमाभंजनाचा खेळ बनला. नेत्यांप्रती आंधळी भक्ती तसाच आंधळा द्वेष असं दुभंगलेलं राजकीय अवकाश आणि सार्वजनिक चर्चाविश्व या निवडणूक कालावधीत तयार झालं. त्याचे परिणाम सर्व क्षेत्रांवर अनिवार्यपणे झाले. देशातील अर्थकारण, लोककल्याणाच्या योजना, नियोजनाची प्रक्रिया, शिक्षण क्षेत्राविषयीची भूमिका ते परराष्ट्र धोरण या सगळ्या क्षेत्रांमध्ये सुरू असलेल्या ’धुमाळी’चे अनुभवी व यथार्थ चित्रण हे या पुस्तकाचे बलस्थान आहे.केवळ व्यक्ती व पक्षांमधील चढाओढ हाच या पुस्तकाचा आशय नाही. दिसणाऱ्या किंवा दाखवल्या जाणाऱ्या ’बरलीया रंगा’ला न भुलता ते खरवडायला सुरवात केली, की आतले प्रवाह, खरे हेतू दिसायला लागतात. त्यांचा वेध या पुस्तकात घेण्यात आला आहे.पक्षीय राजकारण व सत्तास्पर्धा, स्थानिक राजकीय प्रक्रिया, राजकीय घराणी व त्यांची पुनर्रचना, राजकीय अर्थकारण, विविध सामाजिक गटांमधील चढाओढ, सामाजिक चळवळी, प्रश्नांमधून घडणारी विषय पत्रिका अशा विविध मुद्यांची चर्चा करणारे, भवतालच्या घडामोडींचे सविस्तर आकलन घडवणारे पुस्तक ’धुमाळी’,This is the period around the 2014 elections that reshaped Indian politics. Whether politics is local, national, or international, it inevitably involves a struggle to retain what one has and to gain what one does not.However, these elections turned into a game of image creation, management, and the dismantling of opponents’ images. A deeply divided political space and public discourse emerged during this period-marked by blind devotion towards leaders on one side and equally blind hatred on the other. The effects of this divide were inevitably felt across all sectors. From the country’s economy, welfare schemes, planning processes, and education policies to foreign policy, this book vividly and realistically portrays the ongoing 'turmoil' in all these areas.The book is not limited to competition between individuals and political parties alone. When one looks