Librería Samer Atenea
Kálamo Books
Librería Elías (Asturias)
Librería Kolima (Madrid)
Librería Proteo (Málaga)
बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हे बंगाली साहित्यातील अग्रगण्य कादंबरीकार आहेत. त्यांच्या लेखणीतून बंगाली साहित्य समृद्ध झालेच आहे; त्याचबरोबर हिंदी साहित्यही उपकृत झाले आहे. त्यांची लोकप्रियता अशी आहे की गेल्या दीडशे वर्षांपासून त्यांच्या कादंबर्या विविध भाषांत अनुवादित होत आहेत आणि त्यांच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित होत आहेत. त्यांच्या कादंबऱ्यांत स्त्रियांच्या अंतर्वेदनेचे तसेच तिच्या शक्तिमत्त्वाचे अत्यंत प्रभावी चित्रण आढळते. त्यांच्या कादंबऱ्यांमुळे स्त्रियांच्या गौरवाला नवी ओळख मिळाली असून भारतीय इतिहासाकडे पाहण्याची नवी दृष्टी प्राप्त झाली आहे.ते ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिण्यात निष्णात होते. त्यांना भारताचे ’अलेक्झांडर ड्यूमा’ असेही म्हटले जाते.