Librería Samer Atenea
Kálamo Books
Librería Elías (Asturias)
Librería Kolima (Madrid)
Librería Proteo (Málaga)
सुमारे चौदा हजार वर्षांपूर्वी...एक सुवर्णनगरीजिथे शांती, समृद्धी आणि समाधान नांदत होते. चहूबाजूंनी सागराने वेढलेला, विषुववृत्ताने छेदलेला, निसर्गाच्या कृपादृष्टीने समृद्ध असा भूभाग. सुपीक धरती, भरभरून बरसणारा पाऊस आणि वैभवाने नटलेले एक विशाल साम्राज्य.एक महायुद्धज्याच्या ज्वाळांत एक नव्हे, तर दोन प्रजातींचे अस्तित्व जवळजवळ नष्ट झाले. जगाच्या उत्पत्तीइतकाच प्राचीन, इंद्रालाही हेवा वाटावा असा एक बलाढ्य राजवंश, अहंकार, क्रोध आणि प्रतिशोधाच्या अग्नीत हळूहळू भस्मसात झाला.एक साम्राज्ञीअप्सरेचे सौंदर्य आणि सरस्वतीची प्रज्ञा लाभलेली. पराक्रमी सम्राटाची प्रिय पत्नी, महावीर पुत्रांची माता आणि सुवर्णप्रासादात वावरणारी एक भाग्यशालिनी राजस्त्री.पण त्या सुवर्णवैभवामागे दडले होते युद्ध, विरह, विश्वासघात आणि सर्वनाशाचे सावट.आपल्या पतीच्या सामर्थ्याचा उत्कर्ष पाहणारी आणि त्याच साम्राज्याचा विध्वंस स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवणारी ही विलक्षण स्त्री होतीमंदोदरी.ही आहे रावणाच्या पत्नीची नव्हे, तर सिंहलच्या साम्राज्ञीची कथा.एका अशा स्त्रीची कथा, जिचे शहाणपण युद्ध थांबवू शकले नाही; पण जिचे धैर्य विनाशाच्या राखेतही अढळ राहिले.